• Wed. Dec 11th, 2024

अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लसचे विद्यार्थी ठरले चॅम्पियन ऑफ चॅम्पियन

ByMirror

Jul 28, 2022

विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून, पार्श बंब व अथर्व लोटके या स्पर्धेचे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरले.


या स्पर्धेत स्वराज लोटके प्रथम, प्रांजली कोळगे तिसरी, मल्हार कजबे चौथा व विशाल कोळगे याने पाचवा येण्याचा बहुमान पटकाविला आहे. नुकतीच युनिव्हर्सल अबॅकस अ‍ॅण्ड वैदिक मॅथस असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवित अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडविले. या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रतीक शेकटकर, शाहीन शेख व मंजुश्री फल्ले यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *