इंडिया अगेन्स्ट इव्हीएम जनआंदोलनाचे गणेश मंडळांना आवाहन
भोंगे हटविण्याऐवजी इव्हीएम हटावसाठी जनतेने लढा उभारावा -चोभे मास्तर
अहमदनगर (प्रतिनिधी)- अफजल खान वधाचा संपूर्ण प्रसंग व ईव्हीएम मशीनला विरोध दर्शवीत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या जनजागृतीसाठी शहरातील गणेश मंडळांनी प्रबोधनात्मक देखावे सादर करण्याचे आवाहन इंडिया अगेन्स्ट इव्हीएम जनआंदोलनाचे जालिंदर चोभे मास्तर यांनी केले आहे.
गणेशोत्सवात शहरात गणेश मंडळ लोकमान्य टिळकांपासून मोदीपर्यंत अनेक प्रकारचे पौराणिक, राजकीय व सामाजिक देखावे सादर करतात. मात्र अनेक मंडळे अफजल खान वधाचा अपुर्ण देखावा सादर करतात, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण करुन जीवाजी महाले यांनी कृष्णाजी भास्करचे छाटलेले हात या क्षणाचा संपुर्ण देखावा व लोकशाहीसाठी इव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर निवडणुका होण्याच्या उद्देशाने देखावे सादर करण्याचे चोभे मास्तर यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.
भोंगे हटविण्याऐवजी इव्हीएम हटावसाठी जनतेने लढा देण्याची गरज आहे. बॅलेटपेपरवर मतदान झाल्यास लोकशाही वाचणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून यु.यु. ललित यांची नियुक्ती सेवा जेष्ठतेचे उल्लंघन करून झालेली आहे. पूर्वी ते वकील होते, न्यायाधीश नव्हते. 2014 साली सुप्रीम कोर्टात न्यायधीश तर सध्या मुख्य न्यायाधीश झाले असून, त्यांना भाजप सरकारने गिफ्ट दिले असल्याचा आरोप चोभे यांनी केला आहे.
गुजरात दंगल प्रकरणी अमित शहांची वकिली करून त्यांना क्लीन चीट दिली, बाबरी मशीद पाडणे बाबत कल्याण सिंगची वकिली त्यांनी केली होती. टूजी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी वकिली करून घोटाळा झालेला नसताना डी. राजा आणि कनिमोळी यांना जेलमध्ये पाठवले होते. विशेष म्हणजे विजय मल्ल्याचा कोर्ट अवमान आणि दहा हजार कोटी प्रकरणाबाबत 2 हजारचा दंड लावला. नियुक्तीच्या दुसर्या दिवशी ललित यांनी गुजरात दंगलीच्या नऊ केसेस पैकी आठ केसेस निकाली काढून, फाईली बंद केल्या आहेत. आता ते पुढे काय करतील आणि त्यांच्याकडून निष्पक्ष न्यायची अपेक्षा करणे भाबडेपणा सिद्ध होणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.