अहमदनगर (प्रतिनिधी)- अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची नियुक्ती करण्यात आली. समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी भालसिंग यांना नियुक्तीपत्र दिले.
वाळकी (ता. नगर) येथील विजय भालसिंग निस्वार्थ भावनेने सामाजिक योगदान देत असून, त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. एस.टी. बँकेची नोकरी सांभाळून निस्वार्थ भावनेने गरजू घटकांची ते मदत करत आहेत. अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या माध्यमातून अन्याय, अत्याचारा विरोधात लढा देऊन वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. भालसिंग यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे अरुण रोडे यांनी सांगितले.
विजय भालसिंग यांनी मिळालेल्या पदाच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले जाणार आहे. तसेच भ्रष्टाचार, अन्याय व अनागोंदी विरोधात आवाज उठविला जाणार असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल भालसिंग यांचे समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ शेठ, राष्ट्रीय सचिव कृष्णा कवठणकर, राज्य अध्यक्ष विशाखाताई पराडकर, डॉ. प्रसाद पाण्डेय यांनी अभिनंदन केले आहे.