• Thu. Dec 12th, 2024

अनिता काळे यांना कै. तुकाराम गोरे गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

ByMirror

Sep 6, 2022

शिक्षक स्वत:ला झोकून देऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवितात -प्रा.डॉ. संजय नगरकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना कै. तुकाराम गोरे गुरुजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्राचार्य प्रा. डॉ.संजय नगरकर यांच्या हस्ते काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी मनपाचे शहर अभियंता इंजि. सुरेश इथापे, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधीक्षक महेश पाटील, एलआयसी असोसिएटचे अशोकराव गोरे, डॉ. सुदर्शन गोरे, अशोकराव तुपे, सुनील राऊत आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात डॉ. सुदर्शन गोरे यांनी शिक्षकांप्रती आदर भावना व्यक्त करणारा हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. समाजातील शिक्षकांना प्रेरणा देण्याचा एक प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रा.डॉ. संजय नगरकर म्हणाले की, समाजातील शिक्षकांना केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून पुरस्काररुपाने पाठबळ देणे आवश्यक आहे. अनेक शिक्षक स्वत:ला झोकून देऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवितात असतात. त्यांचा दरवर्षी करण्यात येणारा सन्मान सोहळा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. इंजि. सुरेश इथापे यांनी समाज घडविणारे शिक्षकांबद्दल सर्वांनी आदरभाव ठेवावा. शिक्षकांमुळे जीवन सार्थकी व यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.


अनिता काळे भिस्तबाग येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, त्या सामाजिक क्षेत्रात गत दोन दशकापेक्षा जास्त काळापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. महिला सक्षमीकरण व गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांचे सातत्याने सुरु असलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कारार्थी शिक्षिका काळे यांनी केलेल्या कामाचे मुल्यमापन झाल्यास आनखी कार्य करण्यास बळ व प्रेरणा मिळते. मिळालेला हा पुरस्कार सर्व शिक्षकांना समर्पित असल्याची भावना सत्काराला उत्तर देताना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *