• Mon. Dec 9th, 2024

अनधिकृत बांधकाम न थांबल्यास कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याचा इशारा

ByMirror

Jul 15, 2022

केडगावच्या सातपुते गल्ली येथील अनधिकृत बांधकाम थांबविण्याची मागणी

सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांचे महापालिकेला स्मरणपत्र

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, सातपुते गल्ली येथे सुरु असलेले अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी महापालिकेत पुराव्यासह तक्रार करुन देखील सदरचे काम थांबवले जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांनी महापालिका प्रशासनास स्मरणपत्र दिले. सदरचे अनाधिकृत बांधकाम त्वरीत न थांबल्यास कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


केडगाव येथील सिटी सर्व्हे मिळकत नंबर 146 या जागेत अनाधिकृत बांधकाम सुरु आहे. बांधकाम करणारा व्यक्तीचे त्या जागेशी कोणत्याही प्रकारचे मालकी हक्क नसताना त्याने बांधकाम सुरु केले आहे. सदर जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना बांधकाम सुरु करण्यात आले आहे. न्यायालयीन कामकाज व आदेशाचे पुरावे जोडून, महापालिकेत या बांधकामाला हरकत नोंदविण्यात आली होती. तरी देखील बेकायदेशीर बांधकाम थांबवण्यात आलेले नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


कलम 258 प्रमाणे बांधकाम करण्यापूर्वी विपर्यस्त माहिती दिल्याच्या कारणास्तव परवानगी रद्द करण्याचे अधिकार महापालिकेला आहे. तातडीच्या अर्जास 48 तासाचा अवधी उलटूनही अद्यापपर्यंत संबंधितांकडून चालविले बांधकाम रोखण्याची कारवाई महापालिका प्रशासनाने केलेली नाही. सदर बांधकाम करणार्‍याकडे कोणतेही कायदेशीर मालकी हक्क प्राप्त नसल्याचे पुरावे देऊनही कारवाई न झाल्यामुळे सदर बांधकाम पूर्ण झाल्यास याला महापालिका व पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा व दप्तर दिरंगाई जबाबदार राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्मरणपत्र प्राप्त झाल्यानंतर सदरील अनाधिकृत बांधकाम 24 तासात थांबवावे, मुदतीत कोणतीही कारवाई न झाल्यास सदरील मिळकतीसमोर कुटुंबीयांसमोर आत्मदहन करण्याचा इशारा खिची यांनी स्मरणपत्राद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *