जगाच्या उध्दारासाठी बुध्द धम्माची गरज -भंते सुमंगल माहथेरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय भिक्षु संघ व तथागत बुध्दिस्ट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रामणेर विधीकर्ता शिबाराचे उद्घाटन भंते सुमंगल माहथेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करुन करण्यात आले. शहरातील टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे या शिबीरात विद्यार्थी व युवकांना बुध्द धम्माची दिक्षा देण्यात येणार आहे.
शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी पुज्य भंते महामोग्गलयान, भंते पट्टेशन, भंते आनंद, लाहन श्रामणेर, आंबेडकर चळवळीचे वंसतराव गवारे, रिपाईचे संपर्क प्रमुख रोहित आव्हाड, तालुका अध्यक्ष अविनाश भोसले, प्रविण साळवे, तथागत बुध्दिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, सचिव सत्यद्रें तेलतुंबडे, उपाध्यक्ष दिपक अमृत, शिवाजी भोसले, आण्णासाहेब गायकवाड, किशोर कांबळे, प्रकाश कांबळे, मिलिंद आंग्रे, प्रकाश कांबळे, नितिन साळवे, रंगनाथ माळवे, विशाल कांबळे, सिंध्दात कांबळे आदी उपस्थित होते.
भंते सुमंगल माहथेरा म्हणाले की, जगाच्या उध्दारासाठी बुध्द धम्माची गरज आहे. देशात शांती, वैभव नांदण्यासाठी श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून माणुस घडविण्याचे कार्य सुरु आहे. समाजामध्ये जाती-धर्मात तेढ निर्माण करुन स्वार्थ साधण्यासाठी अशिक्षित लोकांचा फायदा घेत आहे. बुध्द धम्माच्या माध्यमातून माणवतेची व समतेची शिकवण देऊन, माणुसकी रुजवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुज्य भंते सचितबोधी यांनी शिबिराच्या माध्यमातून मुलांना संस्काराचे धडे दिले जाणार असून, भविष्यातील आदर्श नागरिक, आई-वडिल व देशाची सेवा करणारा युवक घडविण्याचा या शिबीराचा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
तथागत बुध्दिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी बुध्द धम्म जाणून घेण्यासाठी अशा शिबीरांची गरज असून, या शिबीराच्या माध्यमातून सुजान नागरिक व सक्षम युवक घडविण्याचाही प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. दहा दिवसीय शिबीरास शहरासह ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.