• Mon. Dec 9th, 2024

अंकाई ते अंकाई किल्ला तिसऱ्या टप्प्याची रेल्वे मार्ग चाचणी यशस्वी

ByMirror

Feb 16, 2022

द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत अंकाई ते अंकाई किल्ला या 5

कि .मी. अंतराची चाचणी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पुर्ण होणार असुन यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे . या पुर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे .

गेल्या तीन  वर्षापासुन  नगर ते मनमाड द्रुतगती ( डबललाईन ) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे . यापुर्वि कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता सोमवारी ( दि. १४) रोजी अंकाई ते अंकाई किल्ला या 5

 कि .मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता ऐकूण 35 की मी अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची  माहिती उप मुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार,यांनी दिली .

मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो . मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडी चा वेग कमी होता . तसेच सिंगल लाईन मुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता . तासोनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबुन ठेवावी लागत . मात्र आता हा पुर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे . तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 110 प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे . तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे .पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पुर्ण होणार आहे . सोमवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते मनमाड पर्यतंचा टप्पा पुर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज आहे.

अंकाई ते अंकाई किल्ला द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, सेकंशन सेक्शन इंजिनिअर धर्मेंद्र कुमार,इंजिनिअर सुद्धांसू कुमार,एक्झिकेटीव इंजिनिअर वि. पी. पैठणकर  आदी उपस्थित होते.

या चाचणीसाठी कॉन्ट्रॅक्टर एस.ए.यादव,व त्याचे सहकारी ,तुळशी बिराजदार, सुनिल हेगडे,सुनिल हेगडे,प्रताप शेटे,दीपक येवले, सूरज लोनकने, वैभव क्षिरसागर, शुभम लांडे,राहुल यादव,सुरेश वाघमारे,दीपक येवले, सूरज लोहकणे, शिवा कोणे,तुळशी सिलहाले आदींनी परिश्रम घेतले.

मनमाड ते नगर डबल लाईन ( द्रुतगती ) रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी सोमवारी घेण्यात आली. यात रेल्वेगाडीचा नेमका वेग काढला आहे . या महत्त्वकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असुन नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *